Views


उस्मानाबाद जिल्हयात 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंतच्या लॉकडाऊन कालावधीतील मार्गदर्शक सुचना आदेश जारी.....

 उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)
 
 महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम, 2020” प्रसिद्ध केले असून करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. 
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविला आहे. ज्याअर्थी  दि. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत महाराष्ट्र शासनाने सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. 
            जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदींनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील करोना विषाणु (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 01 सप्टेंबर 2020 पासून ते 30 सप्टेंबर 2020 रोजीचे 24.00 वाजे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवित असल्याचे आदेश जारी केले आहेत.
            उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनचे कालावधीत संदर्भ क्र. 4 च्या आदेशान्वये नमूद केलेल्या गैरकृत्यांबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. तसेच संदर्भ क्र. 5 च्या आदेशामध्ये नमूद गृह विलगीकरण (Home Quarantine) च्या नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तीविरोधात दंडात्मक कारवाई करणेबाबतचे आदेश संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. लॉकडाऊनचे कालावधीत संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात या आदेशासोबत दिलेल्या परिशिष्ट 1 मध्ये नमूद केलेल्या कोविड-19 च्या व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच या आदेशासोबतच्या परिशिष्ट 2 मध्ये नमूद केलेल्या ज्या बाबींना चालू ठेवण्यास वेळोवेळी परवानगी देण्यात आलेली आहे. त्या सर्व बाबी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत पूर्वीप्रमाणे चालू ठेवण्यास परवानगी राहील. तसेच या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश या आदेशासोबत दि. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू राहतील.
        या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील. सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 01सप्टेंबर-2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.
कोविड-19 चे व्यवस्थापनासंदर्भात परिशिष्ट -1 प्रमाणे पूढील सुचना राहतील.
चेहरा झाकणे:- सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवासादरम्यान नागरिकांनी तोंडावर मास्क/स्वच्छ रुमालाचा वापर करणे आवश्यक आहे. सामाजिक अंतराचे पालन:- सार्वजनिक ठिकाणी व्यक्तींनी एकमेकांमध्ये कमीत कमी 6 फूट (2 गज की दूरी) ठेवावे. आस्थापना/दुकाने यांनी एका वेळी 5 पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात/आस्थापनेत उपस्थित राहणार नाहीत तसेच ग्राहकांमध्ये शारिरिक अंतर राहील याबाबत दक्षता घेणे आवश्यक राहील. मेळावे:- मोठे सार्वजनिक मेळावे/समारंभ यांच्यावरील निर्बंध कायम राहतील. 
विवाहासंबंधीत मेळाव्यांमध्ये/समारंभांमध्ये 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही. अंत्यविधीच्या/अंत्ययात्रेच्या कार्यक्रमांमध्ये 20 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास राज्य शासन/स्थानिक प्रशासनाकडून कायदे व नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, गुटखा, तंबाखू इ. तत्सम पदार्थांचे सेवन करण्यास परवानगी असणार नाही.
कामाच्या ठिकाणांबाबत अधिकच्या सूचना - घरुनच काम करणे (वर्क फ्रॉम होम):-शक्य असेल तेथपर्यंत घरुनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) या पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक व वाणिज्य आस्थापनांचे ठिकाणी काम/व्यवसायाच्या तासांची सुनियोजितपणे आखणी करणे आवश्यक राहील. तपासणी व स्वच्छता (Screening and hygiene):- सर्व प्रवेश व निर्गमनाचे ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिंग करणे, पुरेश्या प्रमाणात हॅण्डवॉश व सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. वारंवार निर्जंतुकीकरण:- कामाच्या ठिकाणी वापरण्यात येणारी संपूर्ण जागा, सार्वजनिक सुविधा आणि मानवी संपर्कात येणा-या सर्व जागा उदा. दरवाजाचे हॅण्डल इ. दोन्ही पाळ्यांच्या दरम्यानच्या कालावधीत करावयाच्या स्वच्छतेसह वारंवार निर्जंतुक होईल याबाबत दक्षता घ्यावी.  सामाजिक अंतराचे पालन:- कामांच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होण्यासाठी कामगारांमध्ये पुरेसे अंतर, दोन शिफ्टमध्ये पुरेसा अवधी ठेवण्यात यावा तसेच कर्मचा-यांचे दुपारच्या जेवणाचे वेळी इ. ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होईल याबाबत दक्षता घ्यावी. 
          परिशिष्ट 2 नुसार - CONTAINMENT ZONE मध्ये करावयाची कार्यवाही पूढील प्रमाणे राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात ज्या ठिकाणी करोना रुग्ण आढळून येईल त्याठिकाणी CONTAINMENT ZONE जाहीर करण्याचे अधिकार संबंधित उपविभागाचे INCIDENT COMMANDER म्हणून उपविभागीय अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्राकरिता राहतील. संबंधित उपविभागीय अधिकारी हे केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना व निर्देशांनुसार CONTAINMENT ZONE चे क्षेत्र, कालावधी व त्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्या बाबी चालू राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत वेगळा आदेश काढून त्याबाबत सर्वांना सूचित करतील. CONTAINMENT ZONE बाबत राज्य शासनाचे दि. 19 मे 2020 व दि. 21 मे 2020 मधील सूचना लागू राहतील. 
पूढील बाबींना जिल्ह्यामध्ये प्रतिबंध कायम राहील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व कोचिंग क्लासेस इ. संस्था 30 सप्टेंबर 2020 पर्यंत बंद राहतील. ऑनलाईन / दूरस्थ शिक्षण पद्धतीला परवानगी चालू राहील. तसेच या पद्धतीस प्रोत्साहन देण्यात यावे. सिनेमागृह, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, चित्रपटगृहे (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्सेसमध्ये असलेल्या चित्रपटगृहांसह), कलाकेंद्रे, बार व सभागृहे आणि तत्सम ठिकाणे बंद राहतील.  भारत सरकारच्या गृह विभागाने परवानगी दिलेल्या बाबींव्यतिरिक्त अन्य बाबींकरिता आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करण्यास प्रवाशांना परवानगी असणार नाही. मेट्रो रेल्वे सेवा. सामाजिक/राजकीय/क्रीडा/मनोरंजन/शैक्षणिक/सांस्कृतिक/ धार्मिक कार्यक्रम व इतर सभा संमेलने व मोठे मेळावे यांना प्रतिबंध राहील.
महाराष्ट्र शासनाने व या कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार धार्मिक ठिकाणे व प्रार्थनास्थळे महाराष्ट्र शासनाचे पुढील आदेशापर्यंत जनतेसाठी बंद राहतील. महाराष्ट्र शासनाने व या कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार व्यायामशाळा महाराष्ट्र शासनाचे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. सर्व अत्यावश्यक वस्तूंची (किराणा, दूध, भाजीपाला, फळे इ. जिवनावश्यक वस्तूंची दुकाने) दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील. मेडीकल, औषधी दुकाने 24 तास चालू ठेवण्यास परवानगी राहील. 
पूढील नमूद केलेल्या बाबींना दि. 2 सप्टेंबर 2020 पासून परवानगी राहील.  सर्व अत्यावश्यक (जिवनावश्यक) नसलेल्या वस्तूंची दुकाने वेळोवेळी शासनाने व या कार्यालयाने निर्गमित केलेल्या आदेशांनुसार खालीलप्रमाणे चालू ठेवण्यास परवानगी राहील. सर्व अत्यावश्यक (जिवनावश्यक) नसलेल्या वस्तूंचे मार्केट / दुकाने ही सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत उघडी राहतील. तथापि, कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतराचे (Social Distancing) निकष पाळले गेले नाही अथवा गर्दी केल्यास सदरचे मार्केट / दुकाने शासकीय यंत्रणेकडून तात्काळ बंद करण्यात येतील. उस्मानाबाद जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल पंप सकाळी 8 ते सायंकाळी 7 या वेळेत चालू राहतील. तथापि उस्मानाबाद शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप दररोज 24 तास (24×7) चालू राहील.
उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील पेट्रोल पंप दररोज 24 तास (24×7)चालू राहतील. उस्मानाबाद जिल्ह्यातील बेकरी व स्वीट मार्ट दुकाने दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहतील. तसेच सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत घरपोच सेवा (होम डिलीव्हरी) देण्यास परवानगी राहील. संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात बी बियाणे व खते या कृषि निविष्ठांची विक्री करणारी दुकाने/आस्थापना, बिज प्रक्रिया केंद्र, त्यानुषंगीक बियाणे पॅकींग, हाताळणी केंद्र, बीज परिक्षण प्रयोगशाळा, कृषी यंत्रसामग्री, त्यांचे सुटे भाग (त्याच्या पुरवठा साखळीसह) व त्यांच्या दुरुस्तीची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत चालू राहतील. उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू राहतील.
रेस्टॉरंन्टस मध्ये फक्त स्वयंपायकगृह चालु ठेवुन अन्न पदार्थाची घरपोच सेवा (होम डिलीव्हरी) देण्यास सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत परवानगी राहील. उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांवरील व राज्य महामार्गांवरील धाबे दररोज 24 तास (24 × 7) चालू राहतील. पान, तंबाखू इ. पदार्थांची दुकाने बंद राहतील. मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्समधील फुड कोर्ट / रेस्टॉरंट्स फक्त त्यांना घरपोच सेवा पुरविण्यासाठी सुरु ठेवता येतील. मात्र कोविड-19 चा प्रादुर्भाव पसरु नये यासाठीच्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित करुन दिलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीचे त्यांनी काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोविड-19 च्या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे अनुषंगाने नागरिकांनी सायंकाळी 05.00 नंतर वैद्यकीय तातडीची निकड वगळता इतर कारणासाठी घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करावे. तसेच दर रविवारी जनता कर्फ्यू राहील. त्याचे पालन करावे. हॉटेल्स (निवासी सेवा असलेले) व लॉजेस 100 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी राहील. या आस्थापना चालू करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत शासनाकडून निर्गमित करण्यात येणा-या स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती (SOP) चे पालन करणे आवश्यक राहील. 
सर्व शासकीय कार्यालयांमधील (निकडीची-emergency, आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके – N.Y.K., नागरी सेवा-Municipal Services ची कार्यालये वगळता) कामकाज पूढील प्रमाणे चालू राहील. 1.वर्ग- अ व वर्ग- ब मधील अधिकारी यांची उपस्थिती 100 टक्के राहील. 2.वर्ग- अ व वर्ग- ब मधील अधिकारी वगळता इतर कर्मचारी यांची उपस्थिती कार्यालयातील एकुण कर्मचारी संख्येच्या 50 टक्के अथवा कमीत कमी 50 कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तेवढी राहील. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना उदा. सामाजिक अंतराचे पालन, चेहरा झाकणे इ. बाबींचे पालन होते किंवा नाही याबाबत देखरेख करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात एका अधिका-याची नियुक्ती करण्यात यावी.  सर्व कार्यालयांमध्ये आगमन व निर्गमनाच्या ठिकाणी तपासणी व स्वच्छतेच्या उपाययोजना उदा. थर्मल स्कॅनिंग, हॅण्डवॉश, सॅनिटायझर्स इ. उपलब्ध करुन देण्यात यावेत. सर्व कर्मचा-यांकरिता मास्क उपलब्ध करुन देण्यात यावेत. 
सर्व खाजगी कार्यालये गरजेनुसार 30 टक्के क्षमतेने चालू राहतील. संवेदनशील व्यक्तींचा गट प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता घरी गेल्यानंतर निर्जंतूकीकरणाची पुरेशी खबरदारी घेण्याचे शिक्षण देण्यासाठी सर्व कर्मचा-यांनी निर्जंतूकीकरणाचा कार्यक्रम घ्यावा. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना उदा. सामाजिक अंतराचे पालन, चेहरा झाकणे इ. बाबींचे पालन होते किंवा नाही याबाबत देखरेख करण्यासाठी एका अधिका-याची नियुक्ती करण्यात यावी. कर्मचा-यांच्या कार्यालयामध्ये येण्याच्या व जाण्याच्या वेळांमध्ये अंतर ठेवणे (Staggering of office timings) या पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे व कामकाजाशी संबंधित हालचालीस परवानगी देण्यात यावी.  व्यक्तींच्या व वस्तूंच्या आंतरजिल्हा हालचालीवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. आंतरजिल्हा वाहतूक करणारी वाहने व त्यामध्ये प्रवास करणा-या व्यक्तींच्या अशा हालचालीकरिता कोणत्याही स्वतंत्र परवानगीची/ई-परवानगीची आवश्यकता असणार नाही. खाजगी बस / मिनी बस व इतर वाहनांद्वारे प्रवाशांच्या वाहतूकीस परवानगी राहील. याबाबत मा. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचेकडून जी प्रमाणित कार्यपद्धती (SOP) जारी करण्यात येईल त्याचे पालन करणे बंधनकारक राहील. मोकळ्या जागेतील शारिरीक क्रियांना (Outdoor Physical Activities) कोणत्याही निर्बंधाशिवाय परवानगी राहील. 
सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना पूढील प्रमाणे प्रवासी अनुज्ञेय राहतील. टॅक्सी/कॅबफक्त अत्यावश्यक कामासाठी 1 + 3रिक्षा फक्त अत्यावश्यक कामासाठी 1 + 2चार चाकी वाहन फक्त अत्यावश्यक कामासाठी 1 + 3दुचाकी वाहन 1 + 1 हेल्मेट व मास्क सह  वाहतूक व्यवस्थेमध्ये मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. संवेदनशील व्यक्तींचे संरक्षण:-  65 वर्षांवरील व्यक्ती, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षांखालील मुले यांनी घरीच राहणे आवश्यक आहे. (अत्यावश्यक गरजा व वैद्यकीय सेवेकरिता होणारी हालचाल वगळून) अत्यावश्यक नसलेल्या कारणांकरिता हालचाल करताना व्यक्तींनी मास्क परिधान करणे, सामाजिक अंतराचे पालन, वैयक्तिक स्वच्छता इ. निश्चित केलेल्या अत्यावश्यक खबरदारीचे पालन करणे बंधनकारक राहील. महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने नमूद केलेल्या बाबीकरीता वापरात असलेली प्रमाणित कार्यपद्धती (SOP) यापुढेही वापरणे चालू राहील. राज्य शासनाचे व या कार्यालयाचे अन्य कोणत्याही विशिष्ट/सर्वसाधारण आदेशानुसार परवानगी दिलेल्या बाबी परवानगी आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्तींसह चालू राहतील.  संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या बाबींना प्रतिबंध घालण्यात आलेला आहे त्या बाबींवरील निर्बंध शिथिल करणे व त्या बाबी चालू करणे याबाबत राज्य शासनाकडून प्राप्त होणा-या प्रमाणित कार्यपद्धती (SOP) / मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येईल असे ही आदेशात नमुद केले आहे.
 
Top