Views


उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)
उस्मानाबाद जिल्हा कॉग्रेसची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री मा.बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी कार्याध्यक्ष तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. यशोमतीताई ठाकूर, कार्याध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व ब्लॉक प्रमुखांशी संवाद साधून पक्षसंघटना, कोरोना प्रादुर्भाव व उपाययोजना इत्यादी विषयावर चर्चा केली. प्रारंभी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी गेल्या सहा महिन्यातील जिल्हा काँग्रेसच्या कार्याचा तपशील प्रदेश पदाधिकार्‍यांसमोर मांडला. प्रदेशाध्यक्ष थोरात व यशोमती ठाकूर ताईनी जिल्हा काँग्रेसच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून आगामी काळातही उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बसवराज पाटील, मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तरूण जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगली वाटचाल करेल अशी आशा व्यक्त केली. प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने यांनी केले. तसेच आभार जिल्हाध्यक्ष प्रकाश आष्टे यांनी मानले. यावेळी महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर, दिलीप भालेराव, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील सर, तुळजापूर तालुकाध्यक्ष अमर भैय्या मगर, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार, लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, उस्मानाबाद शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सेवा दल जिल्हाध्यक्ष विलास शाळू, भूमचे रूपेश आप्पा शेंडगे, वाशीचे राजेश शिंदे, परंड्याचे अ‍ॅड. वाघमारे, नगरसेवक रणजित इंगळे, नगरसेवक पिंटू भैय्या रोचकरी, युवकाचे कार्याध्यक्ष सलमान शेख, विद्यार्थी काँग्रेसचे करण साळुंखे, विधी विभागाचे विश्‍वजीत शिंदे, राहूल लोखंडे, युवक काँग्रेसचे लखन पेंदे, राजाभाऊ नळेगावकर, मोईज शेख यांच्यासह प्रतिनिधी हजर होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सींगचे पालन करत केवळ ब्लॉक अध्यक्ष व सेलचे प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
 
Top