Views

यशवंत ब्रिगेडच्या युवक संघटना लोहारा तालुकाध्यक्षपदी नितीन शिरगिरे

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
यशवंत ब्रिगेडच्या युवक संघटना लोहारा तालुकाध्यक्षपदी नितीन माणिक शिरगिरे यांची निवड करण्यात आली आहे. यांना यशवंत ब्रिगेड (महाराष्ट्र ) संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. संतोष वसंत कोळेकर यांनी निवडीचे नियुक्ती पत्र दिले आहे. या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, धनगर समाजाच्या सर्वांगीण उन्नतिसाठी विविध प्रलंबित प्रश्नाच्या लढ्यासाठी, न्याय, हक्कासाठी शेळी, मेंढी व्यवसायाच्या अडचणी सोडवण्यासाठी वाड्या, वस्तीत विखुरलेल्या समाजाला संघटित करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाणारी आणि वाईट प्रव्रॄत्तिला बाजुला् ठेवून चांगली ध्येय धोरणे असणारा धनगर समाजाच्या मागणीवरुन उदयास आलेला यशवंत ब्रिगेड. आजपर्यंत आपण करीत असलेल्या सार्वजनिक कार्याचा विचार करुन तळमळीने काम करणार्या आपल्या सारख्या कार्यकर्त्याला ब्रिगेड मध्ये काम करण्यासाठी संधी दिली आहे. असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.या निवडीबद्दल नितीन शिरगिरे यांचे नगर सेवक गगन माळवदकर लोहारा, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार लोहारा, आदिंनी अभिनंदन केले आहे.


 
Top