Views


खेड येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी गावास भेट देवुन आढावा घेवुन नागरीकांशी संवाद साधला. 

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
लोहारा तालुक्यातील खेड येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने गावास दि.8 ऑगस्ट 2020 रोजी  खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भेट देवुन सद्य स्थितीचा आढावा घेवुन नागरीकांशी संवाद साधला. व गावातील कुटुंबांना आर्सेनिक अल्बमह - 30 या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्याचे वाटप करण्यास सुपूर्द करण्यात आल्या. नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे, आवाहन खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले. यावेळी तहसीलदार विजय अवधाने, जि.प.सदस्य दिपक जवळगे, शिवसेना कक्ष तालुकाप्रमुख कुर्बान खुटेपड़, गटविकास अधिकारी अशोक काळे, सहाय्यक गटविकास अधिकारी ढाकणे, स.पो.नि.अशोक चौरे, सरपंच यशवंत गरड, माऊली ढोणे, उमेश जाधव, सिद्धेश्वर बिडवे, शिवाजी पवार, डॉ.थोरात, मंडळ अधिकारी साळुंखे, तलाठी पवार, अविनाश पवार, यांच्यासह पोलिस प्रशासन, आरोग्य कर्मचारी, कोरोना कक्ष शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top