Views


भूम येथे टाळेबंदी (लॉक-डाऊन) काळात आलेली वीज बिले सरसकट माफ करण्याबाबत मनसेचे विद्युत विभागाला पत्र....(वीजपुरवठा खंडित केल्यास गाठ मनसेशी)

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
  कोरोना सारख्या महाभयंकर आजाराचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने टाळेबंदी(लॉक-डाऊन) जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले शिवाय शेतीवर आधारित सर्वच व्यवहार आणि कामकाज ठप्प झाले,त्यामुळे टाळेबंदी (लॉक-डाऊन) काळातील ग्रामीण भागातील वीज बिले सरकार ने सरसकट माफ करावी तसेच शासन निर्णय होत नाही तोपर्यंत ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना वीज बिले भरा म्हणून तगादा लावू नये तसेच त्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये अन्यथा  वीज विभागाच्या या अतातायी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तीव्र जनआंदोलन छेडावे लागेल आणि मनसेच्या या आंदोलनातील होणाऱ्या परिणामांना स्वतः महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ जबाबदार असेल अश्या आशयाचे पत्र भूम तालुका अध्यक्ष अमोलजी कदम,जिल्हा उपाध्यक्ष शाबीर भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली भूम येथील विद्युत विभागाच्या कार्यालयात देण्यात आलेले आहे.
  यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शाबीर भाई शेख,भूम तालुका अध्यक्ष अमोलजी कदम,शोसल मीडिया जिल्हा अध्यक्ष तथा उप-जिल्हा सचिव किशोरजी गायकवाड,तालुका उप अध्यक्ष योगेश पाटील,सर्कल प्रमुख सागर गिराम,सर्कल प्रमुख अविनाश ढगे तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top