Views


मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज लि मोहा मिल रोलरचे पुजन.
       मनसे प्रदेश सरचिटणीस मा. श्री दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले.
   १ लाख मेट्रिक टण गाळप करण्याचे उद्दिष्ट.

कळंब:-(दिलीप झोरी)
     तालुक्यातील मोहा येथील मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजच्या दुसर्‍या गळीत हंगामातील मिल रोलरचे पुजन मनसे प्रदेश सरचिटणीस मा. श्री दिलीपरावजी धोत्रे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
        यावेळी मोहेकर मल्टीस्टेट व मोहेकर अॅग्रो इंडस्ट्रीज चे चेअरमन मा श्री हनुमंत (तात्या) मडके व कार्यकारी संचालक मा संतोष (भैय्या) मडके तसेच गोकुळ साखर कारखान्याचे चेअरमन भगवान शिंदे व संचालक कार्तिक पाटील तसेच  विद्यानंद बँकेचे संचालक सुधिर गांधी, मोहेकर मल्टीस्टेट चे कार्यकारी संचालक मा विशाल (बाबा) मडके व गावातील गण्यमान्य  प्रतिष्ठित नागरिक सर्व संचालक मडंळ,कर्मचारी शेतकरी आदी उपस्थित होते.
       मोहा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टिस्टेट व मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मोहेकर ग्रुपने
डॉ अशोक मोहेकर यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली व संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री हनुमंत मडके यांच्या प्रचंड मेहनतीच्या आणि कुशल नेतृत्वाखाली व लोकांच्या विश्वासाने गतवर्षी मोहेकर इंडस्ट्रीजच्या गाळपाचा श्रीगणेशा करण्यात आला होता. किमान वेळेत कमाल गाळप करण्यात आले. व शेतकर्‍यांचे समाधान झाले. शेतकरी, शेतमजूर व मुख्यतः उस उत्पादक हे केंद्र स्थानी मानून गावाच्या हिताचा विचार करून गतवर्षी मोठ्या धुमधडाक्यात उदघाटन समारंभ करण्यात आला होता.परंतु गाळपासाठी वेळ कमी मिळाला तरीही किमान वेळेत कमाल गाळप करुन दाखवले व प्रायमरी स्टेजलाही दमदार कामगिरी केली. व गतवर्षीच्या हंगामातील काही अल्पशा दिवसामध्ये इच्छित असे उद्दिष्ट साध्य केले असून, यावर्षी वाढते लक्ष डोळ्यासमोर ठेवून कारखाण्याच्या या हंगामातील मिल रोलरचे पुजन धोत्रेसाहेबांच्या शुभ हस्ते करण्यात आले. गावाची आण बाण व शान असणार्‍या व गावाच्या विकासात आणि वैभवात भर टाकणारा असा हा कारखाना नवनवीन प्रयोग करून अनेक बायप्राँडक्टचे प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहाणार असल्याचे सांगितले जात आहे. जेणेकरून शेतकर्‍यांच्या उसाला योग्य भाव मिळाला पाहिजे व कारखाण्याच्या नावलौकिकही झाले पाहिजे.  प्रथम शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखाण्याची उभारणी करण्यात आली आहे, त्यामुळे शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांसाठी चालवलेला कारखाना म्हनून सर्वदूर सर्वपरिचित झालेल्या कारखाण्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा रोलर पुजनाने शुभारंभ करण्यात आला.
       मोहा येथील मोहेकर इंडस्ट्रीज कारखाण्याचा सन २०२०-२१ चा गाळप हंगामाच्या पुर्व तयारी अंतर्गत मशिनरी ओव्हर आँईलींग करुन जोडणीच्या कामास वेग  देऊन मिल रोलर पुजन मनसे प्रदेश सरचिटणीस धोत्रेसाहेबांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी रोलर पुजनाचा कार्यक्रम हा मोठा गाजावाजा न करता अगदी मोजक्या व साध्या पद्धतीने करण्यात आला. जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने मोठमोठ्या कार्यक्रमात बाधा निर्माण केली आहे. त्यामुळे यावेळी शासनाने घालुन दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करत व सोशल डिस्टंन्सींगचे नियम पाळण्यात आले.आशाप्रकारच्या नव्या हंगामाच्या तयारीसाठी केलेला हा पहिलाच कार्यक्रम आहे. कारखाण्याच्या २०२०-२१ गळीत हंगामाची तयारी सुरू करण्यात आली आहे. हंगामाच्या आढाव्याबाबत माहिती देताना कारखाण्याचे संस्थापक चेअरमन श्री हनुमंत मडके म्हणाले की, येत्या गळीत हंगामाकरीता आपल्या कारखाण्याचे १ एक लाख मेट्रिक टण उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने उस तोडणी, वाहतूक करणेकामी टायर, बैलगाडी, ७१ ट्रॅक्टर, आशा पध्दतीने सर्व तयारीनिशी हंगाम गाळपाची तयारी करण्यात आली. ट्रॅक्टरचे करार पूर्ण झाले आहे.
    मागील वर्षाचा पहिलाच गळीत हंगाम सुरू करण्यास पुरेसा अवधी मिळाला नाही. तरीही सर्व दुरुस्ती व देखभाल व अन्य व्यवस्था करुन सन २०१९-२० कारखाण्याचा पहिला गळीत हंगाम सर्व अधिकारी कर्मचारी, कामगार, उस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, व्यापारी, व कार्यक्षेत्रातील हितचिंतकांच्या अत्यंत मोलाच्या सहकार्यामुळे यशस्वीरित्या पार पाडण्यात यश मिळाले. तरीही आपण गतवर्षी २७ हजार मेट्रिक टण उसाचे गाळप केले. तर कारखखण्याचा सरासरी साखर उतारा १२.५ मिळाला असून कारखाण्याने जाहीर केलेला भाव देण्यात आला.  उसाची पुर्ण रक्कम उस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँकखात्यामध्ये जमा करण्यात आली असल्याचे कारखाण्याचे संस्थापक चेअरमन श्री हनुमंत मडके यानी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना जास्तीत जास्त शेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले. कारण उत्पन्न हे सकस, व निकोप पाहिजे असेल तर आपल्याला शेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही.

इंडस्ट्रीजचे चेअरमन श्री हनुमंत मडके यानी शेतकर्‍यांना शेंद्रिय शेतीचे शास्त्रीय फायदे सांगत शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर शेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले. तसेच उसाला योग्य भाव, व वेळेवर रक्कम अदा करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

 
Top