Viewsपानवाडी येथे एक गाव - एक पोलीस अंतर्गत जनजागृती कार्यक्रम
.......
गुणवंत विद्यार्थ्यांचाही केला सत्कार
......

उस्मानाबाद :-(प्रतिनिधी)
 पानवाडी ता, उस्मानाबाद येथे बुधवार दि, 5 ऑगस्ट रोजी एक गाव - एक पोलीस अंतर्गत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद जिल्ह्यात एक गाव - एक पोलीस उपक्रम राबविण्यात येत आहे. पानवाडी येथे महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रज्ञा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक गाव-एक पोलीस अंतर्गत पानवाडी येथे बुधवार दि, 5 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता हनुमान मंदिरावर कोरोना महामारीच्या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला पानवाडी येथे नेमणूक केलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रज्ञा जाधव, एलपीसी पूजा स्वामी, पंचायत समिती सदस्य विराट पाटील, सरपंच अच्युत कांबळे, उपसरपंच गणपत चव्हाण, चेअरमन राजाभाऊ चव्हाण,  तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल पाटील, जयप्रकाश कदम, पोलीस पाटील सुभाष कदम-पाटील, आशा स्वयंसेविका संगीता ढगे,  ग्रामपंचायत सदस्य सुरेश कदम, विनायक डक, अगतराव डोंगरे, पंडितराव डोंगरे, तानाजी कदम, जि, प, शाळेचे मुख्याध्यापक महावीर निकते, शरद माने, नवनाथ कदम, बिरमल डोंगरे, प्रभू कांबळे यांच्यासह कोरोना योध्दा, गावातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी दहावी बोर्ड परीक्षेत यश मिळविलेल्या ऋतुजा जयप्रकाश कदम, संकेत सूर्यकांत ढगे, श्वेता दत्ता कांबळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना महामारीत चांगले काम केल्याबद्दल आशा, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विराट पाटील, प्रज्ञा जाधव, सुभाष कदम यांची भाषणे झाली. नानासाहेब सावतर सर यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. संकेत ढगे यांनी आभार मानले.


 
Top