Views


मुरुम येथील मैत्रीण ग्रुपकडून शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा संपन्न

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
 सध्या कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. हे संकट देशावर आले असताना बहुसंख्य जनता मानसिक दृष्टया खचली आहे यातून तीला बळ, ऊर्जा व जगण्याचे सामर्थ्य मिळावे त्यावर मात करण्यासाठी आपण देवादी देव महादेवाला साकडं घालून आलेल्या संकंटातून आम्हा सर्वांना बाहेर काढण्यासाठी मैत्रिण ग्रुपच्या वतीने या पारायणाच्या माध्यमातून दि. 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत मुरुम येथे पारायण सोहळा दररोज आपआपल्या घरी सकाळी 6 व रात्री 7 वाजेच्या कालावधीत विधीवत पध्दतीने वाचन करण्यात येत आहे. यामध्ये सौ.पुष्पा जोशी, मीनाक्षी डागा, वंदना कुलकर्णी, जयश्री सुरेश हेबळे, सांगली, शरयू पोतदार, अक्कलकोट, कस्तुरबाई पोतदार, मनीषा भोसगे, अंजली कुलकर्णी, अमिता कुलकर्णी, वैशाली काळे, मीरा शिंदे, संगीता जाधव, सुरेखा हरवाळकर, पूर्वा मोरे, बबिता कोरेकर, विजायलक्षी अतनुरे, अक्कलकोट, कल्पना देशपांडे, उस्मानाबाद, मीनाक्षी माशाळकर, उमरगा, रमा महामुनी, रसिका जोशी, भागीरथी कारडामे, अनिता पुजारी, तुळजापूर, संगीता जोगदंडकर, उस्मानाबाद, शोभा पाटू, अणदूर, शैलेजा भस्मे, नळदुर्ग, शीला जोशी, सुमन पवार, हेमलता काटकर, नळदुर्ग आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मैत्रीण ग्रुपच्या अँडमीन तथा संस्थापक अध्यक्षा अँड.जयश्री भोसगे - हेबळे, उपाध्यक्षा पुष्पा जोशी, सचिव सुमन पवार, सदस्या मीनाक्षी डागा, वंदना कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, शालिनी जोशी, कस्तुरबाई पोतदार, शोभा महामुनी, डॉ.सुवर्णा पाटील, सुनंदा भडंगे, आदींनी वॉटस्अप व एसएमएसद्वारे आवाहन करण्यात आले होते.

 
Top