Views


बसव प्रतिष्ठाणच्या संकेतस्थळाचे माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

लोहारा:-(इकबाल मुल्ला )
अखिल भारतीय सामाजिक संघटना बसव प्रतिष्ठाणच्या संकेतस्थळाचे माजी ग्रामीण विकास राज्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना येथे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.बी. अथनी होते. यावेळी बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, बसव प्रतिष्ठाणचे कार्य स्तुत्य व उपक्रमशील असून या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबविले जात असून ही संघटना महाराष्ट्र भर काम करत आहे. बसव प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे यांचे समाजासाठी झटण्याचे काम हे उल्लेखनीय स्वरूपाचे आहे. बसव प्रतिष्ठाणच्या या संकेतस्थळाला आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा. या संकेतस्थळावर बसव प्रतिष्ठाण माहिती, देणगी, सदस्य नोंदणी, पुरस्कारासाठी नोंदणी यासह इतर माहिती व संघटना स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या सर्व उपक्रमाची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी दिली. बसव प्रतिष्ठाण संकेतस्थळा भेट देण्यासाठी  www.basavpratishthanrp.com या लिंकचा वापर करून माहिती मिळवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

 
Top