Views

राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन कीर्तन व पूजनास परवानगी द्यावी, यासाठी लोहारा तालुका भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन 


लोहारा:-( इक्बाल मुल्ला)


सामाजिक अंतर व नियमांसह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन कीर्तन व पूजनास परवानगी द्यावी, या मागणीसाठी राज्य सरकारच्या विरोधात भाजप प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर, आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुका भाजपच्या वतीने शहरातील हनुमान मंदिरात व तालुक्यातील अचलेर येथील मल्लिकार्जुन मंदिरात सोशल डिस्टंसिंगचे पालन करून घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेटटी, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, प्रशांत काळे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सिद्धू गोपने, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी चव्हाण, युवराज जाधव, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, बालासिंग बायस, विष्णू लोहार, दिलीप पुजारी, आदी, उपस्थित होते.

 
Top