Views


जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात सँनिटायझर व फेसशिल्डचे  वाटप -- अंजुमन हेल्थकेअर सोसायटीचा उपक्रम


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
 कोरोनाच्या संकट प्रसंगी आरोग्य विभागाचे कार्य अतिमहत्त्वाचे राहिले असुन नवजात बाळांना यशस्वीपणे या जगात आणणारे वैद्यकीय विभागातील कर्मचारी यांचे गौरवणीय कार्य होय. इम्रान सय्यद यांच्या पत्नी उस्मानाबाद जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात बाळंतीण झाल्या. त्यांना मुलगा झाला आणि रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे देखभाल केली. याबद्दल सामाजिक कार्यात सदैव कार्यरत राहणारे अंजुमन हेल्थकेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फिरोजभाई पल्ला यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या माध्यमातून कोरोनाच्या संकट समयी आवश्यक बाबी म्हणुन स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, मँटर्न, सिस्टर, व इतर कर्मचारी बंधु भगिणी यांना सँनिटायझर, फेसशिल्डचे वाटप करण्यात आले. रात्रनदिन रुग्णाची सेवा करणाऱ्या कर्मचारी बंधु भगिणींचे शाब्दिक सुमनाने गौरव करण्यात आला. मँटर्न मँडम यांनी अंजुमन हेल्थकेअर सोसायटीच्या या उपक्रमाचे स्वागत करुन आभार मानले. यात प्रामुख्याने मँटर्न श्रीमती लोणे (भाटे) कल्पना, परिसेविका सौ. निंबाळकर प्रेमा, दाणे रंजना, अधिपरिचारिका परसे गिरीजा, बसपुरे एम, मोहिते सानिका, खुणे रुपाली, इंगळे रजनी, सातपुते मँडम, भोयाळ मनिषा, शेजवळ एस पी, सचीन कांबळे, औषधनिर्माता पाटिल सुभाष, क्लर्क देशपांडे तर अंजुमन हेल्थकेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फिरोजभाई पल्ला, वसीस शेख, इम्रान सय्यद, गणेश रानबा वाघमारे, अदि, मान्यवर उपस्थित होते.
 
Top