Views


राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन कीर्तन व पूजनास परवानगी द्यावी, यासाठी उमरगा तालुका भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन
 

लोहारा:-(इकबाल मुल्ला)

सामाजिक अंतर व नियमांसह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन कीर्तन व पूजनास परवानगी द्यावी, या मागणीसाठी राज्य सरकारच्या विरोधात भाजप प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर, आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा तालुका भाजपा अध्यक्ष कैलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अष्टविनायक मंदिर छत्रपती शिवाजी चौक येथे भालचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते अष्टविनायकाची पूजा आणि आरती करून घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, तालुका सरचिटणीस सिद्धेश्वर माने, गटनेते गोविंद घोडके, नगरसेवक आकाश शिंदे,  इराप्पा घोडके, दत्ताभाऊ रोंगे, संचालक अर्जुन कारभारी, नागनाथ गायकवाड, बाबुराव कलशेट्टी, पंकज मोरे, शैलेश नागणे, यांच्यासह भाजपातील पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top