Views


खाजानगर येथील मदिना चौकात असलेल्या नगर परिषदे शाळेत सुरू करण्यात आलेल्या मोहल्ला क्लिनिकचे उदघाटन पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते संपन्न....

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
 खाजानगर येथील मदिना चौकात असलेल्या नगर परिषदे शाळेत सुरू करण्यात आलेल्या मोहल्ला क्लिनिकचे उदघाटन पालकमंत्री व मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत येणाऱ्या व उदभवणाऱ्या अडचणी जाणून घेऊन सविस्तर चर्चा केली.
   यावेळी मैनोदीन पठाण,मसुद शेख,नगरसेवक इस्माइल शेख,खलील सय्यद, बीलाल रजवी, डॉ.के.के. बागवान, नगरसेवक बाबा मुजावर, नगरसेवक खलीफा कुरेशी निसार बागवान इंतियाज पटेल,जाफर मौलाना,व बीलाल मौलाना आदिसह मोहल्ला क्लिनिकचे पदाधिकारी व मुस्लीम बांधव उपस्थित होते.तर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसरात वरील मान्यवराच्या हस्ते   वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी विद्यापीठ सिनेट सदस्य संजय निबांळकर,संचालक दत्तात्रय गायकवाड, डॉ.प्रशांत दीक्षीत अदिसह इतर उपस्थित होते. 
        


 
Top