Views


महिला व बालविकास भवनचे उदघाटन   पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते संपन्न....
       
उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
सामाजिक न्याय भवनच्या धर्तीवर प्रत्येक जिल्हयात महिला व बाल विकास भवन स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून या निर्णयानुसार येथील जुन्या जिल्हा परिषदेतील कार्यरत असलेल्या महिला व बाल विकास कार्यालयात महिला व बालविकास भवनचे उदघाटन  पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) या पुस्तिकेचे प्रकाशनही त्यांचे हस्ते करण्यात आले.प्रारंभी सावित्रीबाई फुले व राजामाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पालकमंत्री गडाख यांनी पुष्पहार अर्पण करून महिला व बालविकास   भवनचे उदघाटन करण्यात आले. 
    यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, खासदार ओमराजे निबांळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, जि. प. उपाध्यक्षा धनजंय सावंत, महिला बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे, कृषी सभापती दत्ता साळुके, तहसिलदार गणेश माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (महिला बालकल्याण) बळीराम निपाणीकर आदिसह इतर मान्यवर उपस्थित होते.
        

 
Top