Views




पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 वा वर्धापन समारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, खासदार ओमराजे निबांळकर,आमदार कैलास घाडगे-पाटील,जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी सचिन
गिरी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी चारूशिला देशमुख,उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे,तहसिलदार गणेश माळी, जि.प.उपाध्यक्ष
 धनजंय सावंत,महिला बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे, कृषी सभापती दत्ता साळुके, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदिसह इतर मान्यवर उपस्थित होते.
    पुढे बोलताना पालकमंत्री गडाख म्हणाले की, संपूर्ण जगात कोविड-19 विषाणूने थैमान घातले आहे. आपला देश व संपूर्ण राज्यात कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू ठेवलेली आहे. आपल्या जिल्ह्यात सर्व यंत्रणा कोरोना चा प्रतिबंध करण्यासाठी अहोरात्र झटत असल्याचे सांगून या सर्व कोरोना योद्धांना त्यांनी  शुभेच्छा दिल्या.
            

 
Top