लिंगायत सेवा संघाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी देवराज संगुळगे
लोहारा:-(इकबाल मुल्ला )
परम पूज्य कोरणेश्वर स्वामी (विरक्त मठ, उस्तुरी) यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगायत सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा इंजिनिअर विजयकुमार शेटे यांनी देवराज संगुळगे यांची लिंगायत सेवा संघाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी निवड केली आहे. संगुळगे यांनी सन २०१४ पासून लिंगायत सेवा संघाच्या प्रचार - प्रसारासाठी मोठे योगदान दिल्यामुळे त्यांची निवड झाली आहे. त्यांच्यावर संपूर्ण मराठवाडा विभागाची जबाबदारी दिल्याने लिंगायत सेवा संघ वाढण्यास निश्चित मदत होईल. त्यांच्यात संघटन कौशल्य असल्यामुळे त्यांनी आपल्या कामातून या परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामान्य जनतेपर्यंत पोहचण्याची कसब त्यांच्यात असल्यानेच त्यांची निवडी झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संगनबसव विरक्त मठ, निलंगाचे मठाधिश प.पू.बसवेश्वर येरटे, बसव कथाकार शिवानंद हैबतपुरे, थोर साहित्यिक राजू जुबरे, प्रदेश अध्यक्ष डॉ.महादेव जोकारे, शेतकरी नेते प्रशांत पाटील, पत्रकार संघ मुरूम शहर, मराठा सेवा संघाचे सचिव श्रीधर इंगळे, विर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, ए.आय.एस.एफ. विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लखन भोंडवे आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.