Views


बिल गेट्स महाविद्यालयाचे नवीन इमारतीमध्ये स्थलांतर


लोहारा:-( इकबाल मुल्ला)

श्री कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बिल गेट्स महाविद्यालयाचे छायादीप लॉन्स शेजारी, औरंगाबाद रोड, उस्मानाबाद येथे नवीन प्रशस्त व सर्व सुविधायुक्त सुसज्ज इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यानिमित्त नवीन इमारतीत सह्याद्री फाऊंडेशनचे डॉ. दिग्गज दापके देशमुख व प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. वसुधा दापके देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. बिल गेट्स महाविद्यालयामध्ये गेल्या वीस वर्षापासून संस्थेचे सचिव डॉ.रमेश दापके - देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  रोजगारभिमुख अद्यावत शिक्षण देण्यात येत आहे. विद्यापीठात एक गुणवत्तापूर्ण महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाची ओळख आहे. सध्याच्या कठीण  परिस्थितीमध्ये पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरात शिक्षण घेणे धोकादायक झाले असून उच्चशिक्षणाची सोय म्हणून या महाविद्यालयात भविष्यामध्ये एमसीए आणि एमबीए या सारख्या अभ्यासक्रमांची सुरुवात करण्याचा मानस डॉ. दिग्गज दापके देशमुख यांनी व्यक्त केला आहे यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरशद रजवी, प्रा. सोमनाथ लांडगे, प्रा. शिवसांब कुंभार, प्रा. रवि वाघे, प्रा. वसंत पाटील,  युवराज भिसे, शशिकांत माने, सतीश सूर्यवंशी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top