Views




जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे पत्रकार संघाच्या वतीने सत्काराने स्वागत


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
उस्मानाबाद जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष तथा दैनिक 'पुण्य नगरी' वृत्तपत्र समुहाचे जिल्हा वृत्तसंपादक धनंजय रणदिवे यांच्या हस्ते सत्कार करून स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात दि.24 ऑगस्ट 2020 रोजी हा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधून विविध विषयावर चर्चा केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणुमंत वडगावे, पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, प्रदेश प्रतिनिधी मोतीचंद बेदमुथा, सहसचिव राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, जिल्हा संघटक अमजद सय्यद, मल्लीकार्जुन सोनवणे, अजित माळी आदींची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष रणदिवे यांनी स्वागत करून जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामांची माहिती देऊन विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यामध्ये विशेषत: उस्मानाबाद तुळजापूर - सोलापूर रेल्वे मार्ग, उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठ दर्जा देणे, उस्मानाबाद येथील नवीन बस स्थानकाचे रखडलेले व दोन वेळा भूमिपूजन केले काम तातडीने सुरु करणे, कृष्णा खोऱ्याच्या कामासाठी केंद्र सरकारकडून अधिक निधी घेऊन कामात गती देणे, नळदुर्ग येथील ट्रामा केअर तातडीने सुरु करणे, उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, आदी विषयांची माहिती देण्यात आली.
 
Top