Views


उस्मानाबाद शहर एआयएमआयएमच्या वतीने सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समधील रुग्णांना मालेगाव काढ्याचे वाटप


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
  कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात महाराष्ट्रासह देशभरात चर्चेत असलेल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या मालेगाव काढ्याचे उस्मानाबाद शहर एआयएमआयएमच्या वतीने सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समधील रुग्णांना वाटप करण्यात आले. विविध आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना काढ्याची 100 पाकिटे देण्यात आली. तसेच शहरात आतापर्यंत 2500 हून अधिक पाकिटे वाटप करण्यात आल्याचे एमआयएम आयएमचे शहराध्यक्ष अजहर सय्यद यांनी सांगितले. युनानी पद्धतीच्या मालेगाव काढ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोरोना संसर्ग होण्याचा धोका कमी होतो, असा दावा केला जात असल्यामुळे या काढ्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. औषधी दुकानांमधूनही मोठ्या प्रमाणात या काढ्याची विक्री होत आहे. सध्या अनेक पक्ष, संस्था, संघटनांमार्फत विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जात असताना उस्मानाबाद शहरात एआयएमआयएमच्या वतीने नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी याकरिता मालेगाव काढ्याचे वितरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये विविध आजारांवर उपचार घेत असलेल्या रुग्णांना देखील मालेगाव काढ्याची शंभर पाकिटे देण्यात आली. यावेळी सह्याद्री फाऊंडेशनचे डॉ. दापके - देशमुख दिग्गज, एआयएमआयएमचे शहराध्यक्ष अजहर सय्यद, इम्तियाज बागवान, सद्दाम मुजावर, शहबाज काझी, अंजुमन हेल्थकेअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला, आदी उपस्थित होते.

 
Top