Views


उस्मानाबाद शहरात आठव्या मोहल्ला क्लिनिकचे उद्घाटन पत्रकार एबीपी माझा चे ब्युरो चीफ राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासना वरील ताण पाहता त्यांना मदत करण्यासाठी  उस्मानाबाद शहरातील मुस्लिम समाज धावून आला. मागील कांही दिवसात कोरोना रोगाची व्याप्ती पाहता भयाचे वातावरण होते.  गरीब गरजू लोकांना शासकीय यंत्रणेकडून व्यवस्थित वैद्यकीय सुविधा मिळत नव्हती. यामुळे सामान्यांच्या मनात  असंतोष निर्माण झाला होता. यामुळे गरजू लोकांची मदत करण्यासाठी उस्मानाबाद शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने मोहल्ला क्लिनिक ची संकल्पना राबविण्यात आली. सुरुवातीला 5 मोहल्ला क्लिनिक ची सुरुवात झाली.  लोकांची गरज पाहता मोहल्ला क्लिनिक ची संख्या वाढत 8 पर्यंत गेली. खिरणी मळा, रसूल पुरा या मोठ्या प्रमाणात रहिवाशी संख्या असलेल्या भागात 8 व्या मोहल्ला क्लिनिक चे उद्धघाटन प्रसिद्ध पत्रकार एबीपी माझा चे ब्युरो चीफ राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डिवायएसपी मोतीचंद राठोड, तहसीलदार गणेश माळी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दगु भाई शेख, नायब तहसिलदार मुस्तफा खोंदे, उपस्थितीत होते. यावेळी उद्धाघाटक राहुल कुलकर्णी यांनी सदर संकल्पनेची स्तुती करीत कोरोना ची व्याप्ती पाहता संपूर्ण  महाराष्ट्रात गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी मोहल्ला कलीनिकचा अभिनव प्रयोग फक्त उस्मानाबाद शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने राबविण्यात येत आहे. याविषयी अभिमान व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसूद शेख यांनी केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मैनुद्दीन पठाण, नगरसेवक खलीफा कुरेशी, बाबा मुजावर, इस्माईल शेख, खादर खाण पठाण, बिलाल तांबोळी, माजी नगरसेवक अफरोज पिरजादे, , एजाज काझी, वाजीद पठाण, खलिल पठाण, मन्नान काझी, बिलाल रझवी, इम्तियाज बागवान, इस्माईल काझी, उपस्थित होते. हा कार्यक्रम सोशल डिस्टनसिंग चे पालन करून घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज शेख यांनी केले तर आभार  मैनुद्दीन पठाण यांनी मानले.
 
Top