Views



मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा 


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
 मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, उस्मानाबाद व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभागाच्या वतीने आयोजित वैचारिक ग्रंथ व मास्कचे वाटप डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि.23 ऑगस्ट 2020 रोजी रोजी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांच्या हस्ते कुमारी शितल पाताळे, गायत्री खंडेलवाल, अंबिका पाताळे, शुभांगी कुलकर्णी, पुजा शिंदे, स्वरूपा मुदकण्णा, प्रिया बिराजदार, निकीता पाताळे, मनोज हावळे, किशोर कारभारी, योगेश पांचाळ आदींना वैचारिक ग्रंथ व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.भिलसिंग जाधव, डॉ.नागोराव बोईनवाड डॉ.सुधीर पंचगल्ले, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ.अविनाश मुळे, प्रा.नारायण सोलंकर, काकासाहेब पाटील, आनंद वाघमोडे, दत्तू गडवे, आदींच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कै.माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. विद्यापीठ ध्वजारोहण प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संविधानाचे वाचन शितल पाताळेसह विद्यार्थी - विद्यार्थीनींनी सामुदायिक पध्दती केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ. महेश मोटे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सुभाष हुलपल्ले यांनी केले तर आभार प्रा.डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी यांनी मानले.   
                  

 
Top