Views
भाजप महायुती परंडा तालुका भाजपाच्या वतीने दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी राज्य शासनाच्या विरोधात भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत रास्तारोको महाएल्गार आंदोलन 


लोहारा:-( इकबाल मुल्ला)
भाजप महायुती व परंडा तालुका भाजपाच्या वतीने 
दुध उत्पादक शेतक-यांच्या गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर १० रू. अनुदान द्या, दुध भुकटी निर्यातीला प्रती किलो ५० रू. अनुदान द्या, दुध खरेदीचा दर ३० रू. लिटर करा, अशा विविध मागण्यासाठी राज्य शासनाच्या विरोधात भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपा महायुतीच्यावतीने रास्ता रोको महाएल्गार आंदोलन परंडा शहरात करण्यात आला. यावेळी आरपीआय चे प्रदेश चिटणीस सजंयकुमार बनसोडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, रासपाचे बप्पा काळे, फकीरा सुरवसे, शहराध्यक्ष जहीर चौधरी, यांच्यासह लोकप्रतीनिधी, भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top