*परंडा नगरपरिषदेच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य. निष्क्रिय प्रशासनाला मनसेचा "खळ्ळ खट्याक" आंदोलनाचा ईशारा*
उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
परंडा नगरपरिषदेच्या हद्दीतील रस्त्यांवर सर्वत्र सध्या मोठं-मोठे खड्डे पडल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचून चिखल-मातीने रस्ते निसरडे झालेले आहेत, रस्त्यावरील या अश्या धोकादायक खड्ड्यांमुळे रस्त्यावरील चालणाऱ्या दुचाकीस्वारांना आपला जीव मुठीत धरून गाड्या चालवाव्या लागतात,चारचाकी गाड्यांना ही या रस्त्याचा फटका बसत असल्याने या रस्त्यांवर दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.
या आशयाचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष शाबीर भाई शेख यांनी मुख्य अधिकारी यांना आज दिले तसेच नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष सामान्य जनतेच्या समस्येकडे वेधले जावे यासाठी परंडा नगरपरिषदेसमोरचं असलेल्या रस्त्यावरील भल्या मोठ्या खड्ड्याचे चित्र मुख्याधिकारी यांच्या दालनाच्या दरवाजावर चिटकविण्यात आले,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पत्राला मान देऊन सामान्य जनतेच्या या महत्वाच्या प्रश्नाला परंडा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी बगल देण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आशा निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल तसेच परंडा नगरपरिषद कार्यालयात मनसे स्टाईल ने खळ्ळ खट्याक आंदोलन केले जाईल आणि या आंदोलनातील होणाऱ्या परिणामांना स्वतः हे निष्क्रिय प्रशासन जबाबदार असेल असे मनसे तर्फे सांगण्यात आले.
यावेळी उस्मानाबाद चे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र गपाट, उप-जिल्हा अध्यक्ष शाबीर भाई शेख,मा.जिल्हा सचिव रोहिदास मारकड,जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष तथा उप-जिल्हा सचिव किशोर गायकवाड,भूम तालुका अध्यक्ष अमोल कदम तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.