राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन कीर्तन व पूजनास परवानगी द्यावी, यासाठी भाजपच्या वतीने सोनारी येथे घंटानाद आंदोलन
लोहारा:-(इकबाल मुल्ला)
सामाजिक अंतर व नियमांसह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन कीर्तन व पूजनास परवानगी द्यावी, या मागणीसाठी राज्य सरकारच्या विरोधात भाजप प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर, यांच्या नेतृत्वाखाली भाजप सोनारी यांच्यावतीने करोडो भक्तांचे श्रद्धास्थान आसलेल्या काळभैरवनाथ मंदीरा समोर राज्यातील सर्व मंदीरे सुरु करण्यासाठी कुंभकर्ण निद्रअवस्थेत झोपलेल्या उद्धव सरकार जागे करण्यासाठी घंटानाद अंदोलन करण्यात आले. यावेळी शिवानंद तळेकर, विलास खोसरे, नागेश गर्जे, राहुल काळे, रवि खुळे, समीर पुजारी, अशोक गुळमिरे, राजाभाऊ गुळमिरे, अंगद सिरसट, मारुती हांगे, राहुल फले, अशोक माने, अजय इटकर, नानासाहेब कोकीळ, अनिल इटकर, सुरेश गाढवे, यांच्यासह भाविक भक्त, व्यापारी,उपस्थित होते.