Views


उमरगा ईदगाह येथे मुस्लिम युवकांनी लोकसहभागातुन कोव्हीड सेंटरचे उभारणी


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
केवळ प्रशासनावर  व सरकारवर अवलंबून न राहाता,  समाजाचे देणे लागतो ह्या उदात्त भावनेने येथील मुस्लिम युवकांनी समाजातील नागरिकांच्या मदतीने उमरगा शहरानजीकच्या ईदगाह येथील फंक्शन हॉलला एका उत्तम सुविधायुक्त कोविड केंद्रात परिवर्तन करून आदर्श निर्माण केला. त्याचे हस्तांतरण मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक बडे, नोडल अधिकारी डॉ.विक्रम आळंगेकर , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जितेंद्र शिंदे, डॉ.उदय मोरे, नगराध्यक्षा सौ.प्रेमलता टोपगे, दिलीप भालेराव, जेष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे, विजय वाघमारे, महेश माशाळकर, अतिक मुन्शी, बाबा औटी, याकुब लदाफ, खालिद शेख, माने, ऍड.खाजा शेख, अलीम विजापुरे, याकूब लदाफ,  शमीम सास्तूर, निजाम व्हंताळे, वहाब अत्तार, रोटरीचे सचिव अनिल मदनसुरे, नगरसेवक, व्यापारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी मान्यवर मंडळीनी मनोगत व्यक्त केले. सर्वसोयियुक्त हे कोरोना केंद्र उत्तम प्रकारे चालवून दाखवु अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंन्ग यांच्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्यूमन व्हॅल्यूझ या संस्थेच्या वतीने या कोव्हीड सेंटर साठी दहा पीपीई किट देण्यात आले. 35 बेडचे केंद्र असून सोशल मीडियातुन ' उमरगंस " व  उमरगा डिबेट या  व्हाट्स ग्रूपच्या माध्यमातून आवाहन केल्यावर मोठ्या  प्रमाणात आर्थिक मद्त मिळाली. याकरिता बाबा जाफरी, जाहेद मुल्ला, कलीम पठान, खाजा मुजावर, अय्युब मौलाना, अस्लम शेख, फिरोज लाला, नसीर खान, अज़हर शेख, अमजद मनियार, मनीष सोनी, तरुणांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबा जाफरी व सूत्रसंचालन मनिष सोनी यांनी केले तर आभार खाजा मुजावर यांनी मानले.

 
Top