Views


जिल्हा रूग्णालयास आमदार तानाजी सावंत यांच्याकडून 3 ॲम्बुलन्स

उस्मानाबाद:-(प्रतिनिधी )
 कोविड -19 च्या अनुषंगाने  जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटर मधील रुग्णांसाठी माजी पालकमंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रा. तानाजी सावंत यांच्या वतीने  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्याकडे 3 ॲम्बुलन्स देण्यात आल्या.  यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, आमदार कैलास पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे उपस्थित होते.

 
Top