Views


कळंब शहरातील जनता कर्फ्यु  चा कालावधी कमी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाची मागणी.

कळंब:-(प्रतिनिधी)
कळंब शहरातील कोरोना वाढती संख्या लक्षात घेता व कोरोना बाधीतांशी  गावातील अनेक लोकांचा संपर्क आलेला असल्याने ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने  शहरात जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेवून दि.3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.
               मात्र हा कालावधी छोटे व्यावसायिक व्यापारी फेरिवाले यांच्यासाठी त्रासदायक होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे सर्वजण अडचणीत सापडले आहेत. म्हणून या छोट्या व्यावसायिकांच्या व्यापाऱ्यांच्या मजूरांच्या आडचणी लक्षात घेऊन जनता कर्फु चा कालावधी कमी करावा जेणेकरून गोरगरिबांची उपासमार होणार नाही. तरी सदरील जनता कर्फु चा कालावधी दि.03 ते दि.06 असा कमी करण्याची मागणी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कळंब च्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असून यावर जिल्हा चिटणीस मुसद्देक काझी, प्रा. डॉ. संजय कांबळे सुरेश टेकाळे, महंमद चाऊस आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
           तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल यांच्यावतीने ही उपविभागीय अधिकारी कळंब यांना निवेदन देण्यात आले असून  या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय घोगरे, बाळासाहेब शेळके, प्रेमचंद कांबळे, वैभव काळे, तय्यब हाश्मी धनंजय घोगरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top