Views




*सास्तुर निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना मशाल फाऊंडेशन,पुणे यांचेकडून शैक्षणिक साहित्याची मदत*


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना दिनांक नऊ ऑगस्ट 2020 रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून पुण्यातील मशाल फाऊंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे किट्स वाटप करण्यात आले. या शैक्षणिक किट्स मध्ये १०० दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग्ज, 500 वह्या, चित्रकलेचे साहित्य, सॅनिटायझेशनसाठी साबण, मास्क इ. साहित्य शाळेचे मुख्याध्यापक बी. टी.नादरगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरूपात शाळेत उपस्थित निराधार दिव्यांग विद्यार्थी दत्ता गिरी व सोनाली बेळे यांना मान्यवरांच्या हस्ते शालोपयोगी शैक्षणिक किट्स चे वितरण करण्यात आले. सदर किट्स मशाल फाऊंडेशन, पुणे या संस्थेचे प्रमुख शरद महाजन यांच्या दातृत्वातून उपलब्ध करून देण्यात आले. सास्तूर निवासी दिव्यांग शाळेतील 100 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार साहित्याचे वितरण करण्यात आले. सास्तूर सारख्या ग्रामीण भागात निवासी दिव्यांग शाळेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाचे कार्य निस्वार्थ भावनेने केले जात आहे. समाजानेही या चांगल्या कार्याला भरीव मदत करावी. यासाठी पुण्य नगरीतील मशाल फाऊंडेशन कडून समाजातील दात्यांनी  प्रेरणा घेवून, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. असे प्रतिपादन प्रा.डॉ. महादेव शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माकणी गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षणतज्ञ प्रा.डॉ. महादेव शिंदे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून मशाल फाऊंडेशन पुणे या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रा.विष्णु शिंदे, माकणी येथील आदर्श शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते गौरीशंकर कलशेट्टी, आयासीड फाऊंडेशन माकणी या संस्थेचे संचालक महेश शिंदे, आयसीड संस्थेचे पुणे येथील सदस्य नितीन नरखेडकर, ज्ञान प्रबोधिनी सामाजिक संस्था, हराळी येथील सामाजिक कार्यकर्ते किशन सूर्यवंशी, सुरेश मरगळे, श्री.गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम नादरगे, श्री.शांतेश्वर दिव्यांग व्यावसायीक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रा.बी.एम.बालवाड, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे उपस्थित होते.
    सदर कार्यक्रमासाठी शाळेतील विशेष शिक्षिका अंजली चलवाड, राष्ट्रीय दिव्यांग खेळाडू प्रयागताई पवळे, प्रशालेतील कर्मचारी वृंद विठ्ठल शेळगे, ज्ञानोबा माने, एन.सी.सूर्यवंशी, गोरक पालमपल्ले, डी. एस. सगर, सूर्यकांत कोरे, शंकरबाबा गिरी, माधव मुंडकर, सुरेखा परीट, सविता भंडारे, आदी, उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मशाल फाऊंडेशन चे व्यवस्थापक प्रा.विष्णु शिंदे यांनी केले तर सूत्रसंचलन विठ्ठल शेळगे यांनी केले.

 
Top