भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कळंबच्या वतीने दि. 15 ऑगस्ट रोजी मा. तहसीलदार अस्लम जमादार साहेब यांना खालील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
कळंब:-(प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कळंबच्या वतीने दि. 15 ऑगस्ट रोजी मा. तहसीलदार अस्लम जमादार साहेब यांना खालील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
1) शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेमध्ये परदेशी शिक्षणासाठी SC. ST. OBC . OPEN साठी उत्पन्नाची अट नसावी.
2)केंद्रीय अभ्यासक्रमाच्या ICSE च्या दहावी इतिहासाच्या पुस्तकात "Total history & Civics " या मध्ये बाबासाहेबांचा उल्लेख नाही, आशा भारतरत्नाचा विसर पडणे सहजासहजी नसून मनूवादी व विषमतेचे बीज पेरल्यासारखे आहे.
3) पदोन्नती मधील आरक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधिन राहून पदोन्नतीत आरक्षण खुल्या प्रवर्गाप्रमाणे आवश्यक आहे मात्र मागासवर्गीयासाठीची पदोन्नती प्रक्रिया राबविली जात नाही.
4) डॉ. आनंद तेलतुंबडे यांना बनावट प्रकरणात अटक करून कारागृहात बंदिस्त केले आहे . त्यांना तात्काळ जमीन द्यावा.
मागासवर्गीयावरील होत असलेल्या अन्यायाविरुद्ध दखल घेण्यात यावी या बाबतचे निवेदन माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान भारत सरकार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र राज्य यांना माननीय तहसीलदार साहेब कळंब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले , या प्रसंगी तालुका अध्यक्ष लक्ष्मण धावारे , जेष्ठ मार्गदर्शक सी.आर.घाडगे , रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे , विशाल धावारे , उत्तरेश्वर घोडके , अल्ताफ शेख , अतुल गायकवाड , महेंद्र शेंडगे , किशोर वाघमारे, अक्षय आवाड उपस्थित होते.