Views


जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत लाॅक डाऊन-जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे .
 काय आहेत नियम व अटी

 उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोजच्या रोज वाढत असून त्याला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी लाॅक डाऊन चा कालावधी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढली आहे.
    याबाबत जिल्हाधिकारी यांनी रविवारी (दि.02) काढलेल्या आदेशात म्हटले आहे की जिल्ह्यातील कोरणा विषाणू चा वाढत जाणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून 31 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आलेल्या लोकांच्या कालावधीत नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले. आहे नागरिकांनी चेहरा झाकणे तोंडावर मास्क रुमालाचा वापर करणे सामाजिक अंतराचे पालन करणे आस्थापना लोकांनी एक वेळी पाचपेक्षा अधिक व्यक्ती दुकानात आस्थापनेत उपस्थित राहणार नाहीत ग्राहकांत अंतर राहील याबाबत दक्षता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक मेळावे समारंभाला निर्बंध घालण्यात आले आहे. विवाह समारंभात 50 पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाकारली आहे अंत्ययात्रेत विधीसाठी वीसपेक्षा जास्त जणांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
   सार्वजनिक ठिकाणी मध्य पान गुटखा तंबाखू आधी पदार्थांचे सेवन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शक्य असेल तिथे घरातूनच काम करण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा सर्व प्रवेश व निर्गम मनाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग करणे, हँडवॉश व सॅनिटायझर उपलब्ध करून देणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच सर्व अत्यावश्यक दुकाने सेवा नियमित अनुज्ञेय वेळेनुसार सुरू राहणार आहेत. जिल्हा अंतर्गत बससेवा शारीरिक अंतर ठेवून व निर्जनतूकी करणाच्या उपाय योजनेसह 50% आसन क्षमतेचे ने सुरू राहील.
आंतर जिल्हा प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहे. अत्यावश्यक सेवेत व्यतिरिक्त इतर सर्व आत्ता पण हा बाजारपेठात दुकान आहे सकाळी 09 ते सायंकाळी 07 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. त्याची अंमलबजावणी 05 ऑगस्टपासून राहील शाळा महाविद्यालय शैक्षणिक प्रशिक्षण कोचिंग क्लासेस आधी संस्था बंदच राहणार आहेत व शेती सह केश कर्तनालय सलून ब्युटी पार्लर सुरू राहणार आहेत .दुचाकीवर दोघांना तीन चाकी वाहनात तिघांना तर चारचाकी वाहनांचा चौघांना प्रवासाची मुभा राहणार आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे यामुळे सर्वांनी लाॅक डाऊन काळात प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे
 
Top