Views
बार्टीतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ऑनलाईन जयंती साजरी


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या वतीने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे (भापोसे), मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, दिलावर सय्यद, कीर्ती शेलार, जिल्हा प्रकल्प अधिकारी तुषार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोहारा तालुक्यातील वडगांव गां येथे ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली. त्यामध्ये प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हणमंत दणाने (तंटा मुक्ती अध्यक्ष वडगांव), उपाध्यक्ष लहू गायकवाड होते तर प्रमुख व्याख्याते कुलदीप गायकवाड (संभाजी ब्रिगेड उपाध्यक्ष कळंब) हे होते. यावेळी कुलदीप गायकवाड यांनी साहित्य सम्राट अण्णाभाऊ यांचे सामाजिक कार्य वर्तवले त्यामध्ये त्यांनी गायलेल्या छक्कड, पोवाडे, समाजप्रबोधन याविषयी माहिती दिली. त्यानंतर नेहरू युवा केंद्राच्या निकिता गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांचे वंचित घटकांना केलेले सहकार्य आणि त्यांचे समाज प्रबोधन सांगितले. त्यानंतर युवा गटाचे ज्ञानेश्वर पाटील यांनी बार्टीच्या एमपीएससी, युपीएससी, आय.बी. पी.एस.विषयी ऑनलाईन क्लासेसची माहिती दिली. समतादूत किरण चिंचोले यांनी बार्टीच्या कोरोना महामारीच्या काळातील योजना सांगितल्या. या कार्यक्रमास मुख्याध्यापक विजय गायकवाड, सचिन पवार, ज्ञानेश्वर पाटील, गोपाळ फुलसुंदर, पत्रकार जीवन गायकवाड, समतादूत नागनाथ फुलसुंदर, पंडित पवार, शिवाजी यल्लोरे, अमर माळी, शहीदा सय्यद, समतादूत रमेश नरवडे, सुहास वाघमारे, गोविंद लोमटे, गणेश मोटे, अर्चना रणदिवे, यांच्यासह अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत नागनाथ फुलसुंदर यांनी केले तर आभार अध्यक्ष हणमंत दणाने यांनी मानले.
 
Top