कळंब तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने दुध उत्पादकांच्या न्याय मागण्यांसाठी एल्गार आंदोलन
कळंब:-(प्रतिनिधी)
दुध उत्पादकांना भाववाढ, दुधाला 10/- अनुदान व दुध भुकटीला 50/- अनुदान मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी, रासप, रिपाइं, शिवसंग्राम, रयतक्रांती संघटना यांच्या वतीने कळंब येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकुर, आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अजित दादा पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन बार्शी रोड, मराठवाडा दुध डेअरी समोर, राज्य शासनाच्या विरोधात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष प्रा.दिलीप पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मकरंद पाटील, जिल्हा चिटणीस मिनाज शेख, तालुका सरचिटणीस संजय जाधवर, भाजप तालुका उपाध्यक्ष शिवाजी गिड्डे, रासप तालुका अध्यक्ष पांडुरंग लोकरे, सुनील ताटे, राजा टोपे, आबासाहेब रणदिवे, परशुराम देशमाने, हणुमंत शेळके, गणेश जावळे, संदिप कोकाटे, बाळासाहेब शेंडगे, आदी उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन पोलिस निरीक्षक तानाजी दराडे व पोलीस उपनिरीक्षक गुशींगे यांना देण्यात आले.