Views


मी ३ ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही --  आ. सुजितसिंह ठाकूर

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी कुटुंबातील सर्वांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केली. परिवारातील ६ सदस्य कोरोना बाधित आले. काल परत सदस्य व संपर्कातील सर्वांचे RT PCR केले. माझ्यासह परिवारातील आणखी ३ तर संपर्कातील ३ बाधित तर ३ अहवाल प्रतिक्षेत आहेत. माझ्यासह सर्वांची पकृती चांगली आहे. लक्षणे नाहीत. काळजी घेतो आहे. आपणही आपली व परिवाराची काळजी घ्यावी. मी ३ ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. काळजीपोटी अनेकांचे काॅल येतात. पण सर्व काॅल घेणे शक्य नाही. क्षमस्व. कृपया काही असल्यास SMS द्वारे कामाकरिता उपलब्ध असेन. माझ्यासह कोणालाही लक्षणे नाहीत. योग्य काळजी, उपचार आणि सर्वांचे प्रेम, सद्भावना आहेतच. आम्ही सर्व बरे होऊत. लवकरच बरा होऊन सेवा हाच संकल्प घेऊन सक्रीय असेन असा संदेश भाजपा प्रदेश सरचिटणीस मुख्य प्रतोद विधानपरिषद आ. सुजितसिंह ठाकूर यांनी फेसबुक द्वारे दिला आहे.
 
Top