Views


नेहरु युवा केंद्राच्या संचालकपदी नियुक्तीबद्दल प्रमोद हिंगे यांचा सत्कार 

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
आपल्यावर सोपवलेली जवाबदारी आपण प्रामाणिक व चोखपणे पार पाडली तर तीच खऱया अर्थाने देशभक्ती आहे असे प्रतिपादन नेहरु युवा केंद्राचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे नुतन संचालक तथा जिह्याचे सुपूत्र प्रमोद हिंगे यांनी केले. उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि.) या गावचे मुळ रहिवाशी तथा नेहरु युवा केंद्राचे धाराशिव जिह्याचे प्रथम युवा समन्वयक प्रमोद हिंगे यांची केंद्र शासनाने नुकतीच महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच ते धाराशिव येथे आले असता नेहरु युवा केंद्र व धाराशिव येथील मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक धनंजय काळे, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी त्रिंबक डेंगळे - पाटील, जिल्हा महिला व बालकल्याण विभागाचे शिरीष शेळके, कौटुंबिक न्यायालयाचे विजय गव्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नेहरु युवा केंद्राच्या वतीने तसेच त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने प्रमोद हिंगे यांचा शाल, श्रीफळ देवून व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमोद हिंगे यांनी नेहरु युवा केंद्राच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राबविण्यात येणाऱया विविध उपाययोजनांची माहिती दिली. या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार कमलाकर कुलकर्णी, नेहरु युवा केंद्राचे विकास कुलकर्णी, विजय शेवाळे यांच्यासह नेहरु युवा केंद्राचे सर्व तालुका समन्वयक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी हिंगे यांच्या हस्ते नेहरु युवा केंद्राच्या समन्वयकांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

 
Top