Views




पालकमंत्री गडाख यांच्याकडून वाशी, तेरखेडा व कळंब
येथील कोविड केअर सेंटर ला भेट व रुग्णांशी संवाद

उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव  गडाख यांनी वाशी, तेरखेडा व कळंब येथील कोविड केअर सेंटरला भेट देवून रुग्णांची  आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच प्रशासनाच्यावतीने कोविड केअर सेंटर मध्ये  उपलब्ध करून दिलेल्या  आरोग्याच्या सोयी सुविधांची पाहणी ही त्यांनी केली.
        यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे पोलिस अधिक्षक राजतिलक रौशन, नगराध्यक्ष नागनाथ नायकवाडी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, गटविकास अधिकारी खिल्लारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ. हणमंत वडगावे, उपविभागीय अधिकारी अहील्या गाठाळ, तहसिलदार भालचंद्र यादव, तहसिलदार मंजुषा लटपटे,  तालूका आरोग्य अधिकारी डाँ.गोवर्धन महेंद्रकर, वैद्यकीय अधिक्षक डाँ. मंजूराणी शेळके आदि उपस्थित होते.
      तेरखेडा ता.वाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, कोविड केअर सेंटर, कळंब येथील आयटीआय कॉलेज हॉस्टेल येथील कोविड केअर सेंटर, सोजर मतीमंद हॉस्टेल, कोविड सेंटर, रायगड कोविड सेंटरला पालक मंत्री गडाख यांनी भेट दिली तेथील लोकांशी संवाद साधून प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आरोग्य सुविधा ची माहिती घेतली. 
    आरोग्य विभागाला असलेल्या अडचणी ची माहिती घेऊन त्या तात्काळ सोडून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना विरुद्ध ची ही लढाई दीर्घकाळ चालेल. कोरोना विरोधची लस आणखीही तयार झालेली नाही. तरी ज्या नागरिकांना पूर्वीचे काही गंभीर आजार असतील त्या नागरिकांनी तर अत्यंत काळजी घ्यावी व विनाकारण घराबाहेर पडू नये,  असे आवाहन  श्री गडाख यांनी याप्रसंगी केले.
    कोरोना मुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. शासन व प्रशासन कोरोना विरुद्धचा लढा योग्य पद्धतीने लढत असून नागरिकांनीही या लढ्यात दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री गडाख यांनी केले.



 
Top