उस्मानाबाद जिल्ह्यात मनसे कडून उसाची मोळी देऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन....
उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील खतदुकानदार युरिया खताचा साठा दडवित असून शेतकऱ्याना युरिया उपलब्ध नाही असे सांगत चढ्या दराने दुकानदारा मार्फत युरिया विक्री केली जात आहे शिवाय युरिया घ्यायचा असेल तर त्या बरोबर दुसऱ्या खताची गोनी घ्यावीच लागेल अशी अट लावत शेतकऱ्याला नाहक भुर्दंडीचा सामना करावा लागत आहे याच विरोधात मनसे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गपाट यांच्या नेत्र्त्वामध्ये मनसे जिल्हा टीम यांनी जिल्हा अधिकारी कार्यालया ला धडक देत शेतकऱ्याला युरिया खत हे क्रुषि विभागामार्फत किंवा थेट ग्रामपंचायती ला देऊन शेतकऱ्याला होत असलेल्या अडचणीवर त्वरित पर्याय काढण्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली उस उत्पादक शेतकरीला युरिया खत वेळेवर भेटत नसल्याने उसाची वाढ पूर्णपणे होत नाही यासाठी उसाची मोळी जिल्हा अधिकारी यांना देत येणाऱ्या अडचणीकड़े त्यांचे लक्ष वेधण्यात आले त्याच बरोबर दूध दरवाढीबाबतचा निर्णय शासनाने त्वरित घ्यावा या विषयी निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्ह्यामधील प्रमुख पदाधीकारी उपस्थित होते. महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली गायकवाड, शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष सुदीपजी मोरे, जिल्हा उप अध्यक्ष शाबीरभाई शेख, जिल्हा उपअध्यक्ष दत्ताजी बोंदर, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष पाशाभाई शेख, विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष कुणाल महाजन, कळंब तालुका अध्यक्ष सागर बारकुल, मीडिया प्रमुख किशोर गायकवाड, विद्यार्थी सेना उस्मानाबाद शहरअध्यक्ष संजय पवार, उस्मानाबाद विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष नीलेश जाधव, संतोष बारकुल, कळंब शहर अध्यक्ष अतुल राऊत, तसेच मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.