Views


घरगुती व शेतीचे संपूर्ण वीजबिल माफ करण्यात यावे-- मनसे तालुकाध्यक्ष अतुल जाधव 

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
घरगुती व शेतीची संपूर्ण वीजबिल माफ करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मनसे लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव यांनी तहसीलदार विजय अधाने यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटामुळे लोहारा तालुक्यासह संपूर्ण देशाचे अर्थचक्र थांबले आहे, लोंकांच्या हाताला काम नाही, जनता प्रचंड अडचणीत सापडली आहे. कोरोनाच्या या महाभयंकर संकटामुळे गेले चार माहीने सर्व नागरिक घरात बसून आहेत. अनेक छोटे, मोठे, व्यवसाय बंद पडले आहेत. अशातच विज वितरन कंपनीने भरमसाठ वीज बिले पाठऊन नागरिकांची एक प्रकारची लुबाडणूक सुरु केल्याचे दिसून येत आहे. नागरिक आधीच चिंताग्रस्त असताना हे नवीन आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी शेती व घरगुती विजबिल माफ करावे, अन्यथा आम्हाला वाढीव विजबिलाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष अतुल जाधव, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब रवळे, तालुका उपाध्यक्ष सतिश बनसोडे, तालुका सचिव संदीप मोरे, शहराध्यक्ष अल्ताफ सुंबेकर, नागेश संदिकर, बालाजी साळुंके, यांच्या सह्या आहेत.

 
Top