Views


सोलापुर जिल्हयातील बार्शी शहर हे कोरोना हॉटस्पॉट आहे व भूम शहर व तालुक्यातुन नागरीक व्यापारी जिल्हा बंदी

भुम :-  (आसिफ जमादार) 

       कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरीकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत भूम शहर व तालुक्यातील सर्व नागरीकाना ग्रामीण रुग्णलय भूम च्या वतीने कळवीण्यात येते की , आत्ता यापुढे खरी गरज आहे काळजी घेण्याची आपल्या शेजारील सोलापुर जिल्हयातील बार्शी शहर हे कोरोना हॉटस्पॉट आहे व भूम शहर व तालुक्यातुन नागरीक व्यापारी जिल्हा बंदी असताना देखील विनापरवानगी ने येजा करत आहेत .  
      तालुक्यामध्ये कोरोना पॉजिटिव्ह आलेले बहुतेक रुग्ण : बार्शीलाच पॉजिटीव्ह आले आहेत . तेव्हा भूम शहर व तालुक्यातील सुजान नागरीकांना रुग्णालया तर्फ आवाहन करण्यात येते . की बार्शी किंवा इतर जिल्हयामध्ये जाणे येणे टाळा व ही बाब प्रशासनापासुन लपवणे टाळा जेणे करून लवकर निदान होऊन संसर्ग वाढणे टाळता येईल . त्याच सोबत बाहेरील जिल्हयातून येजा करणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी खाजगी वाहनाने ये जा करुन कोरोना वाढवण्यास कारणीभुत ठरु शकता तेव्हा सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी रहावे .
     तसेच विनाकारण घराबाहेर पडणे टाळा अत्यावश्यक काम असेल तर तोंडाला मास्क व सॅनिटायझर हे सोबत असावे गर्दीमध्ये जाणे टाळा सार्वजनिक ठीकाणी   अंतर पाळा दर दोन तासांनी गरम पाणी प्यावे नेहमी हात पाय स्वच्छ साबनाने धुवावे  तसेच बाहेरून आल्यानंतर आपले कपडे गरम पाण्यात जंतुनाशक टाकुन त्यामध्ये पाच मिनीटे भिजवुन ठेवावे . तसेच बाहेरुन आपण ज्यावेळेस पण घरी जाऊ त्यावेळी प्रत्येकाने गरम पाण्याची वाफ घ्यावी जेणे करून जर  चुकुण संसर्ग झालाच तर त्याला घरामध्येच मारता येईल आपले व आपल्या कुटुंबाचे कारोणा विषाणुपासुन संरक्षण होईल . तसेच ज्या व्यक्तींना घश्यामध्ये खवखव , कोरडा खोकला , ताप श्वास घेण्यात त्रास ईत्यादी लक्षणे आढळून आल्यास त्वरीत रुग्णालयाशी संपर्क साधुन स्वतःला अलगीकरण करून घ्या जेणे करून लवकर निदान होऊन संसर्ग वाढण्याचा धोका कमी होईल , 
     तसेच गोलेगाव येथिल निवासी शाळा येथे अलगीकरणची सोय आहे तसेच रुग्णांची संख्या पाहता कुंथलगीरी येथे देखील अलगी करण व्यवस्था निर्माण करण्याचे नियोजीत आहे . त्यासोबत लवकरच नगरपालीकेच्या खाली फीवर क्लिनीक चालु करण्यात येणार आहे तेथे रक्तातील आक्सीजनचे प्रमाण ताप मोजणी होणार आहे , 
   त्याचसोबत आपल्या भूम येथे देखील लवकरच  कोव्हीड टेस्ट कीट व्दारे तपासणी होणार आहे जेणे कर लवकर निदान होऊन उपचार करता येईल याची सर्व सुजान नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन वैद्यकिय अधिक्षक डॉ.सदीप जोगदंड व वैद्यकिय अधिकारी अमोल शिनगारे , ग्रामीण रुग्णालय भूम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 
Top