Views


उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील गलथान कारभार: महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट संघटनेचे निवेदन
 
 भूम:-(प्रतिनिधी) 

    महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवार (दि.07) रोजी उपविभागीय अधिकारी भुम यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. 
  कोरोना सारख्या महाभयंकर महामारीने महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला ग्रासले आहे.हया महामारीचा नाश करण्यासाठी शासन प्रशासन आपले सर्वस्व पणाला लावुन काम करत आहे.  पोलीस डॉक्टर नर्स पुढारी सर्व जण प्रयत्न करत आहेत. यालाच अपवाद म्हणजे आसु तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद  येथील रमजान पटेल हा व्यक्ती ञास होऊ लागल्याने बार्शी येथील अंधारे हॉस्पीटल येथे अ‍ॅडमिट झाला .
    तेथे डॉक्टरांनी त्यांना दोन ते तिन दिवस अ‍ॅडमिट केले. त्यांना कोरोना सिमटनस आढळल्याने त्यांना उस्मानाबाद येथे पाठवण्यात आले .त्यांच्या बरोबर त्यांची बायको ही होती .उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात त्यांना कोरोना रुग्णांसाठी जी सुविधा हवी होती ती सुविधा त्यांना उपलब्ध झाली नाही. तेथील डॉक्टरांचा  नर्स चा अत्यंत निष्काळजीपणा आढळून आला. आणि तीन तारखेच्या राञी त्त्यांचा आॅक्सीजन पुरवठा काढुन घेऊन रमजान पटेल यांना मृत घोषित केले. 
     रमजान पटेल यांनी रुग्णालयात आलेला वाईट अनुभव चिञफीत काढुन त्यांनी  स्वतःहा च्या भावाला पाठवली. तरी त्या रात्री कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.  
   यावेळी  मराठवाडा अध्यक्ष आसिफ जमादार,  अॅड सिराज मोगल, फिरोज शेख, अज्जु जमादार,  सलमान पठाण, सुलेमान पठाण, शेरखान पठाण, हुसेन बेग, आसलम बागवान,
 
Top