Views


कळंब पंचायत समिती च्या वतीने शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई

कळंब:-(प्रतिनीधी)

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव टाळण्यासाठी कळंब पंचायत समिती च्या वतीने शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई मंगळवार (दि ०७ )रोजी करण्यात आली. 
कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नेमून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या कडून दंड वसूल करण्यात आला आहे. या दरम्यान तालुक्यातील आंदोरा गावात रूपये १२०० , मस्सा गावात रूपये ३४०० व येरमाळा येथे फक्त दोनशे रूपये असे मास्क तोंडाला न लावणे, सोशल डिस्टंसींग फज्जा उडवणारे व दुचाकीवरून दोघे अथवा तिघे जण प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करीत दंड वसूल करण्यात आला आहे. अशाप्रकारे दंड वसूल केल्यावर अन्य नागरिकांना वचक बसेल यासाठी या कारवाया करण्यात आल्या असल्याचे समजते.ही कारवाई पंचायत समिती चे सहाय्यक गटविकास अधिकारी पी.एन.कुसनेनेवार, विस्तार अधिकारी व्ही. जे. जाधव, बी. पी. जोगदंड, यांच्यासह पोलीस नाईक मनोज दळवे, प्रशांत सोनटक्के आदींनी केली 
     
 
Top