कोरोना" महा योद्धा "पुरस्कार नळदुर्गचे ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे व आयुब शेख यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
नळदुर्ग:-(प्रतिनिधी)
कोरोना संकटाच्या काळात दैनिक तरुण भारत ,सामना'चे ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे व एन टी व्ही न्युज मराठीचे पत्रकार आयुब शेख यांनी जीवाची परवा न करता सोशल मिडीयाच्या माध्यमातून व बातम्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत जे योगदान दिले, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या वतीने कोरोना महायोद्धा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला सध्या राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने सार्वजनिक कार्यक्रम न घेता अप्रत्यक्षरित्या ऑनलाईनद्वारे सन्मानपत्र ई – मेलद्वारे पाठवून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.