Views


सह्याद्री फाऊंडशेन च्या वतीने उस्मानाबाद सरपंच परिषद जिल्हा उपाध्यक्ष श्री सत्तार शेख यांचा आयोजित यथोचित सत्कार समारंभ संपन्न

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
  उस्मानाबाद जिल्हा सरपंच परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर बेंबळी येथील सत्तार शेख यांची नुकतीच वर्णी लागल्याने सह्याद्री फाऊंडेशन चे सर्वेसर्वा डाॅ.दिग्गज दापके-देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सह्याद्री फाऊंडेशन उपाध्यक्ष डाॅ.इलियास खान, बेंबळी ग्रामपंचायत सदस्य महेबूब कुरेशी, सह्याद्री फाऊंडेशन सदस्य नाना करंजकर,आकाश दापके-देशमुख गजान्न पाटील, मजहर खान पठाण, राजभाऊ नळेगावकर, प्रा.ओम कुंभार सर, तुळजापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख, हणुमंत सरवदे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्हयातील सगळयात चांगले कार्य म्हणून त्यांची ओळख सर्वञ आहे. असे यावेळी डाॅ.दिग्गज दापके-देशमुख यांनी सांगीतले.

 
Top