Views


आसु  येथील मयत रमजान पटेल मृत्यू प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
परंडा तालुक्यातील आसू येथील कोरोणा रुग्ण रमजान पटेल यांच्या वर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे कोरोणा रुग्ण रमजान  पटेल यांच्या मुत्यू प्रकरणी चौकशी करून   मृत्यूला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व त्यांच्या कुटूंबाला आर्थीक मदत करावी  अशी मागणी महाराष्ट्र मुस्लीम फ्रंन्ट च्या वतीने मुख्यमंत्र्या कडे करण्यात आली आहे .
  गुरुवार (दि ९)  रोजी  तहसील कार्यालय परंडा येथे नायब तहसिलदार   गणेश  सुपे यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे  परंडा तालूक्यातील आसु येथिल रुग्ण रमजान पटेल यांचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जी पणा मुळे झाला असुन या मुत्यूस जबाबदार असणारे डॉक्टर , व इतर कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी व मयत च्या कुटूंबाला आर्थीक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे .
     यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रईस मुजावर , जिल्हा  कार्यअध्यक्ष तोफिक मुजावर ,परंडा व तालुका अध्यक्ष मुर्तुज सय्यद  तय्यब मुजावर, आहेमद भोले व महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top