Views


मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजग्रहावर हल्ला करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी -- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रोजगार आघाडी उस्मानाबाद

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान राज्य ग्रहाची तोडफोड अज्ञान व्यक्तीने केल्याबद्दल या घटनेचा जाहीर निषेध करून सदरील कृत्य करणार्‍यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रोजगार आघाडी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव यांनी लोहारा तहसिलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, दादर मुंबई येथील राजग्रह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ पुस्तकासाठी हे घर बांधले होते. राजगृह येथे जगभरातील आंबेडकरी अनुयायी भेट देण्यासाठी येतात. आंबेडकरी अनुयायांसाठी श्रद्धास्थान व अस्मियता आहे. दि.7 जुलै 2020 रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञान दोन व्यक्तीकडून राज्य ग्रहाची तोडफोड करण्यात आली. तसेच घराच्या काचावर ही दगडफेक करण्यात आली आहे. या घरातील कुंडयाचे ही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेच्या व बहुजनाच्या भावना दुखावल्या आहेत. तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले लोहारा तालुका यांच्यावतीने आम्ही या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. या घटनेची सीबीआय चौकशी करून दोषी व्यक्तीवर कडक शासन करण्यात यावे, व त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे, व यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव उस्मानाबाद आठवले गट,  सम्राट ग्रुप कार्याध्यक्ष कृपाल भैय्या माटे, सम्राट ग्रुप उपाध्यक्ष कबीर सोनवणे लोहारा, सम्राट ग्रुप जिल्हा सचिव  नंदन थोरात लोहारा, सदस्य अजित सोनवणे, अक्षय सोनवणे, बाबासाहेब शिंदे, यांच्या सह्या आहेत.

 
Top