Views


महाराष्ट्र पत्रकार संघाचा विविध संस्था व पत्रकारांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान, प्रा.सुरेश बिराजदार, डॉ.दा.ब.पंतगे यांना संस्थात्मक सन्मानपत्र प्रदान

लोहारा:-( इकबाल मुल्ला)
      कोरोनाच्या संकटात विविध संस्थांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने उमरगा शहरातील विविध संस्थांना संस्थात्मक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँकेचे चेअरमन प्रा.सुरेश बिराजदार, श्रीकृष्ण रक्तपेढीचे संस्थापक डॉ.दा.ब.पतंगे, गुंजोटीच्या श्रीकृष्ण सेवाभावी संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुभाष हुलपल्ले, सचिव रेखाताई पवार यांना कोविड योद्धा  संस्थात्मक पुरस्काराने  गौरविण्यात आले. समाजकार्य करताना नि:स्वार्थीपणे सेवाभाव ठेवून करावे लागते. अशा सन्मानाने माणसाला नवीन कार्य करण्याची ऊर्जा, प्रेरणा व प्रोत्साहन मिळते या कौतुकामुळे पुढे काम करण्याची शक्ती मिळाल्याने चांगले काम होते. महाराष्ट्र पत्रकार संघाने कोवीड योद्धा म्हणून केलेला सन्मान आमच्यासाठी नवचेतनाच असल्याचे मत श्रीकृष्ण रक्तपेढीचे संस्थापक तथा इंद्रधनु वृद्धाश्रमाचे अध्यक्ष डॉ.दा.ब.पतंगे यांनी बोलताना भावना व्यक्त केल्या.
यावेळी शहरातील पत्रकार अविनाश काळे, पत्रकार अंबादास जाधव, पत्रकार बालाजी वडजे, पत्रकार समीर सुतके, पत्रकार गिरीश भगत, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.किरण सगर, रोटरी क्लबचे सचिव प्रा.युसूफ मुल्ला, बलसूर येथील आरोग्य सेविका सोनाली पाटील (सगर), पीप्युल्स अॅलल्मिक असोसिएशन इंडियाचे सचिव महमंदरफी शेख यांचा  महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, सचिव प्रा.डॉ.सुधीर पंचगल्ले, मराठवाडा सदस्य प्रा.डॉ.सुभाष हुलपल्ले, तालुकाध्यक्ष बालाजी व्हनाजे आदिंनी त्यांच्यापर्यंत जावून त्यांना सन्मानपत्र देवून कृतज्ञता व्यक्त करुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

 
Top