Views

प्रा.राजा जगताप यांना प्रेस संपादक व पञकार सेवा संघाचा  पुरस्कार प्राप्त

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)
               येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील, मराठी विभागाचे प्रा.राजा जगताप यांना, त्यांनी ,सध्याच्या कोरोना परिस्थितीत लाॅकडाऊनमध्ये स्तंभ  लेखक म्हणून, प्रत्येक्ष स्पाॅटवर जाऊन सातत्याने कोरोना संबंधी विविध विषयावरील केलेले लेखण व गरजूंना केलेली मदत याची दखल घेवून 
प्रेस संपादक व पञकार सेवा संघाने "कोविड योध्दा"हा पुरस्कार देवून नूकताच त्यांचा गौरव केला आहे.
प्रेस संपादक व पञकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.आंबेगावे डी.टी,सुरेखा जाधव राज्य सचिव,सुजाता गुरव राज्य महिला अध्यक्षा,सविता कुलकर्णी राज्य महिला कार्याध्यक्षा,नरेंद जमादार राज्य संघटक यांनी राजा जगताप यांना "कोविड योध्दा" हा पुरस्कार देवून अभिनंदन केले आहे.या अगोदर प्रा.राजा जगताप यांना, महाराष्ट्र पञकार संघ, मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्ली,मानवाधिकार संरक्षण समिती दिल्ली, ईगल फाउंडेशन रत्नागीरी,समस्त जोगी समाज महासभा दिल्ली,मानव संसाधन विकास संस्था,एच.आर.डी.ओ.दापोडी,पुणे. यांनी "कोविड योध्दा" म्हणून   त्यांचा गौरव केला आहे.तसेच महराष्ट्र राज्य व दिल्ली येथील विविध फाउंडेशन आणि सामाजिक संस्थांनी,साप्ताहिकांनी सन्मानित केले आहे.
लाॅकडाऊनमध्ये कोरोना संबंधी  स्तंभ लेखक म्हनून केलेल्या   लेखनाबद्दल विविध पुरस्कार मिळाल्याने त्यांनी सामाजिक संस्था,फाउंडेशन,साप्ताहिक, यांचे आभार मानले आहे व समाधान व्यक्त केले आहे.


 
Top