Views


मनसेचे जालिंदर भाऊ कोकणे यांची उमरगा - लोहारा विधानसभा अध्यक्षपदी निवड

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तसेच मनसेनेते अमीतजी ठाकरे, अभिजीतजी पानसे, आमदार राजूदादा पाटील, सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे,  राज्य उपाध्यक्ष जावेदभाई शेख, जिल्हा संघटक अमरराजे कदम, जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या उमरगा - लोहारा विधानसभा अध्यक्षपदी जालिंदर भाऊ कोकणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गेली विधानसभा निवडणूकीत जालिंदर भाऊ कोकणेंनी लक्षवेधी मते घेऊन आपली ओळख या मतदार संघात निर्माण केलेली होती. नेहमीच कोकणे हे तालुक्यातील सामाजिक कामात अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याची दखल पक्षाने घेऊनच त्यांना हि जबाबदारी दिली गेली असावी.त्यांच्या या नियुक्तीपत्रात कोणतीही गटबाजी न करता पक्षाचा व सर्वसामान्यांचा विश्वासाला तडा जाऊ न देता पक्ष कार्य करण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यांच्या या निवडीचे जिल्हा संघटक अमरराजे कदम, जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगीरे, उपजिल्हाध्यक्ष अविनाश साळुंके,  उमरगा तालुकाध्यक्ष हरिदास जाधव, लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव, लोहारा विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष विवेक बनसोडे, उमरगा शहराध्यक्ष राजूदादा चुंगे, लोहारा शहराध्यक्ष प्रविण संगशेट्टी, या सर्वांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.
 
Top