Views


महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने विविध संस्थात्मक  कोविड योद्धा कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित 

उस्मानाबाद:-( प्रतिनिधी) 

कोरोनाच्या संकटात विविध संस्थांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने मुरूम शहरातील विविध संस्थांना संस्थात्मक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूमचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील यांना कोविड योद्धा  संस्थात्मक पुरस्काराने गुरुवारी (ता.२) रोजी गौरविण्यात आले. यावेळी शहरातील व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन उमेश कारभारी, सचिव श्रीकांत मिणीयार, शाखाधिकारी सिद्रामप्पा तुगावे, नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अनिताताई अंबर व माजी नगराध्यक्ष सुधीर अंबर, श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे, उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, अमृत वरनाळे, शाखाधिकारी दत्तात्र्य कांबळे, श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, डॉ.आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ.राम बजगिरे, डॉ.सायबण्णा घोडके, बसव प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे, रुग्ण हक्क परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.खाजालाल ढोबळे, एस.के.डिजीटलचे जाफर शेख यांचा महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. महेश मोटे, सचिव प्रा.डॉ. सुधीर पंचगल्ले, मराठवाडा सदस्य प्रा.डॉ.सुभाष हुलपल्ले, तालुकाध्यक्ष बालाजी व्हनाजे, सदस्य तात्यासाहेब शिंदे, राजेंद्र घोडके आदिंनी त्यांच्यापर्यंत जावून त्यांना सन्मानपत्र देवून कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

 
Top