Views


कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषि संजीवनी सप्ताह म्हणून शेतकऱ्यांची आष्टा का येथे शेतीशाळा संपन्न

उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)

लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे हरित क्रांती चे जनक कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषि संजीवनी सप्ताह म्हणून शेतकऱ्यांची दि.3 जुलै 2020 रोजी शेतीशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निशीकांत भाऊ सोमंवशी (CA) होते. यावेळी कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन निशिकांत सोमवंशी  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून कृषी सहाय्यक सचिन पवार, अॕड.सयाजी शिंदे,श्री रवि शिदोरे, मुकेश मुळे, राम आप्पाराव राजा, कृषी मित्र पिंटू मदने, ग्रा.पं.सदस्य दुधाराम पवार, प्रगतशील शेतकरी अरुण पाटील, प्रशांत सोमवंशी, बालाजी औटी, श्रीशेल ब्याळे, प्रविण बोरगांवकर, गोविंद काटे, अदि, उपस्थित होते. यावेळी कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी शेतकऱ्यांना गट शेती करावी, सोयाबीन उडीद इतर पिकाची घ्यावयाची काळजी, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड बद्दल   मार्गदर्शन  केले. व तसेच अॕड.सयाजी शिंदे, रवि शिदोरे, मुकेश मुळे, राम आप्पाराव राजा यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रविण चिंचनसुरे यांनी केले. यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते.

 
Top