मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तेरखेडा गावात शिवसेनेच्या वतीने आर्सेनिक आल्बम गोळ्या शक्तीवर्धक (होमेपॕथिक)वाटप करण्यात आल्या व प्रत्येक नागरिकांचे बी.पी व आॕक्सिजन ची तपासणी करण्यात आली.
उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील
तेरखेडा येथे सोमवार(दि.27)रोजी जिल्हा धाराशिव शिवसेना यांच्या वतीने मा.ना.मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तेरखेडा गावात आर्सेनिक आल्बमच्या गोळ्या व शक्तीवर्धक (होमेपॕथिक)वाटप करण्यात आल्या या गोळ्या वाटप व प्रत्येक नागरिकांचे बी.पी.व आॕक्सिजन ची तपासणी केली.
यावेळी जि.प.सदस्य उध्दव साळवे,विभाग प्रमुख श्रीराम घुले,ग्रां.पं.सदस्य रणजित घुले,शाखाप्रमुख नाना घुले,युवसेना गणप्रमुख काका पौळ,डाॕ.सचिन होळकर,अमोल बगाडे, अक्षय फरताडे व पदाधिकारी उपस्थित होते